महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड
अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस रस्त्यावर, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड
नाशिक : महाविद्यालयीन विश्वात विशेष महत्त्व असलेला प्रेमदिन अर्थात व्हॅलेंटाइन डे अवघ्या दोन दिवसांवर आलेला असताना तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. प्रेमदिनाचे औचित्य साधत बाजारपेठ प्रेमी युगुलांसाठी आकर्षक भेटवस्तूंनी सजली आहे. महाविद्यालये करोना महामारीमुळे अजून बंद असल्याने प्रेमदिन साजरा करण्यासाठी काही मर्यादा आल्या असल्या तरी हा दिवस इतरत्र साजरा करण्याचे नियोजन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीसही रस्त्यावर उतरणार आहेत.
महाविद्यालयात पाऊल ठेवल्यानंतर चित्रपटांमध्ये पाहिलेले गुलाबी विश्व अनेकांना खुणावते. कधी वर्गात तर कधी आपल्याच मित्र परिवारातील आवडत्या व्यक्तीजवळ व्यक्त होण्यासाठी किं वा साद घालण्यासाठी प्रेम दिनाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा करोनामुळे १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. १५ फे ब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार असली तरी त्याआधीच येणाऱ्या प्रेमदिनाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. तरुणाईचा हा उत्साह पाहता बाजारपेठेत हृदयाच्या आकारातील लाल रंगाचे फु गे, शुभेच्छापत्रे, रंगीत फु लांचे बुके , टेडी वेअर, किचेन, लहान-मोठय़ा आकारातील माती तसेच धातू शिल्प, चॉकलेट अशा वेगवेगळ्या भेटवस्तू बाजारात दिसू लागल्या आहेत. पारंपरिक शुभेच्छांची चौकट मोडण्यासाठी काही प्रेमवीरांनी आगाऊ नोंदणी करत आपल्या आवडत्या व्यक्तीचे छायाचित्र असलेली फ्र ेम, उशीचे अभ्रक, मॅजिक कप अशा काही हटके वस्तुंची मागणी के ली आहे. दुसरीकडे, महाविद्यालये बंद असल्याने शहरापासून हाके च्या अंतरावर असलेल्या सोमेश्वर, नवश्या गणपती, बालाजी मंदिर, गंगापूर धरण परिसर, पांडवलेणी, आसारामबापू पूल परिसर याशिवाय कु ठे फिरायला जाता येईल याची चाचपणी तरुणाईकडून सुरू आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून दरवर्षी व्हॅलेंटाइन डेला विरोध के ला जातो. आपला विरोध नोंदविण्यासाठी त्यांच्याकडून आंदोलनाचा मार्ग अवलंबला जातो. त्यामुळे याआधी शहरात तणावाचे प्रसंगही उद््भवलेले आहेत. या वर्षी अद्याप कोणत्याही संघटनेने जाहीरपणे व्हॅलेंटाइन डेला विरोधाची भाषा के लेली नाही. तरीही शहरातील कायदा सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये आणि प्रेमवीरांचा उत्साहही नियंत्रणात राहावा यासाठी पोलिसांनी जमावबंदीचाआदेश लागू के ला आहे. यामुळे प्रेमदिनावर असणारे खाकीचे सावट पाहता प्रेमाचा रंग कसा, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.