बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर ; पाणीवाटप करारावर स्वाक्षऱ्या होणार

आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात शेख हसिना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांचीही भेट घेतील.

नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना भारत दौऱ्यावर आल्या आहेत. मंगळवारी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा होणार असून यावेळी संरक्षण, व्यापार, जलवाटप आदी महत्त्वाच्या विषयांवर करार होण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात शेख हसिना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांचीही भेट घेतील. दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी हसिना यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. तसेच दिल्लीतील निझामुद्दीन औलिया दग्र्यालाही त्यांनी भेट दिली. कुशियारा नदीच्या पाणीवाटपावर २५ ऑगस्ट रोजी मंत्रीस्तरीय बैठकीत करार निश्चित झाला आहे. या करारावर हसिना आणि मोदी स्वाक्षऱ्या करतील. भारत आणि बांगलादेशमध्ये तब्बल ५४ सामायिक नद्या आहेत. यातील सात नद्यांच्या पाणीवाटपाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे.