बांबूचे बंध विणणाऱ्या आदिवासींची उपासमार

कापडी पट्टीचा स्वस्त पर्याय मिळाल्याने स्थानिक शेतकऱ्यांची पाठ

कापडी पट्टीचा स्वस्त पर्याय मिळाल्याने स्थानिक शेतकऱ्यांची पाठ

विरार : करोनाकाळात आदिवासी महिलांना दोन महिने आर्थिक दिलासा देणारा बंध व्यवसाय स्थानिक शेतकऱ्यांकडून कापडी पट्टीचा वापर सुरू झाल्याने संकटात आला आहे. शेतकऱ्यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणाऱ्या बंधाच्या (बांबूपासून तयार केलेला दोर) खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने आदिवासी भागातील बंध व्यावसायिक अडचणीत आले आहेत. भारे बांधण्यासाठी शेतकरी स्वस्तात मिळत असलेल्या कापडी पट्टय़ांचा उपयोग करीत असल्याने बंधांची विक्री होत नसल्याने आदिवासींसाठी दोन महिने चालणाऱ्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

भातपिकाची कापणी केल्यानंतर त्याचे भारे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना बंधांची  गरज भासते. ढोबळमानाने एका शेतकऱ्याला पाचशे ते दोन हजार नगांपर्यंत बंधाची गरज भासते. यामुळे आदिवासी बांधव जंगलातील लहान बांबूपासून हे बंध बनवितात. वसई तालुक्यात घाटेघर, सायवन, काळभोन, लेंडी, तिल्हेर, करजोन या भागातून बंध तयार करून गावागावात किंवा आठवडे बाजारात विक्री केली जाते.

शेकडो महिला-पुरुष बंध विक्रीचा व्यवसाय करतात. भातकापणीच्या हंगामात आदिवासींचा दोन महिने रोजगाराचा प्रश्न मिटून जातो. या व्यवसायातून चांगला पैसा मिळत असल्याने दिवाळीसारखे सण मोठय़ा उत्साहाने साजरे करतात. पण मागील काही वर्षांपासून शेतकरी टिकावू म्हणून कापडी पट्टय़ांना पसंती  देत असल्याने हा रोजगार आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. यंदा शेतीवर परतीच्या पावसाचे संकट आल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे या बंधची मागणी घटली आहे.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

ताज्या तोडलेल्या ओल्या बांबूचे ५-६ फूट लांबीच्या अंतरावर तुकडे करून हे तुकडे दगडावर ठेचून ३-४ दिवस सुकविले जातात आणि शंभर बांधाचा गड्डा करून प्रति शेकडा (१०० नग) दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत विकले जातात. मात्र कोरोना व कापडी पट्टय़ांच्या आलेल्या संकटामुळे हा व्यवसाय बंदकरण्याची वेळ या आदिवासी कुटुंबांवर आली आहे.

पावसाचे संकट आलेले आहेच, पण सर्वाधिक परिणाम हा सध्या भाताचे भारे बांधण्यासाठी कापडी पट्टय़ांचा मोठय़ा प्रमाणावर केल्या जाणाऱ्या वापरामुळे  बंध व्यवसायच धोक्यात आला आहे.

हे वाचले का?  राज्य मंडळाकडून बारावी, दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर… लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा कधी सुरू होणार?