भवानी देवी ऑलिम्पिकसाठी पात्र

तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.

विश्वचषक तलवारबाजी स्पर्धा

तमिळनाडूच्या सीए भवानी देवी हिने टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.

हंगेरी येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान तिने ही कामगिरी साकारली. सांघिक गटात भारताला उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाकडून पराभूत व्हावे लागले, पण भवानीने समायोजित अधिकृत मानांकन पद्धतीनुसार हे स्थान मिळवले. जागतिक क्रमवारीत ती ४५व्या स्थानी आहे. आठ वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकावणारी भवानी रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकली नव्हती.

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी भवानी देवीची प्रशंसा केली आहे. ‘‘ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भवानीचे खूप अभिनंदन. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिला माझ्याकडून शुभेच्छा,’’ असे रिजिजू यांनी म्हटले आहे.