“भाजपा मित्रपक्षांचा वापर करून त्यांना संपवण्याचं काम करते”; रोहित पवारांची टीका

कोणत्याही पक्षाला सध्या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे बच्चू कडू काय म्हणातात, यापेक्षा जनता काय म्हणते, हे जास्त महत्त्वाचं आहे, असेही ते म्हणाले.

बिहारमध्ये भाजपाशी असलेला वाद शिगेला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देत भाजपाशी असलेली युती तोडली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना संपवण्याचं काम करते, अशी परिस्थिती जेडीयूची होऊ नये, म्हणून नितीशकुमार यांनी सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला असावा.”, असे ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? –

“नितीशकुमार हे मुरलेले नेते आहे. बिहारमध्ये पासवान यांचा पक्ष भाजपासमवेत होता. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दर, महाराष्ट्रात शिवसेना आणि महादेव जानकार यांचा पक्ष या सर्वांचं काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. भाजपा छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना संपवण्याचं काम करते, अशी परिस्थिती जेडीयूची होऊ नये, म्हणून नितीशकुमार यांनी सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला असावा. ”, अशी प्रतिक्रिया रोहीत पवार यांनी दिली आहे.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

बच्चू कडूंनाही खोचक टोला

“बरेच दिवस बच्चू कडू हे शिंदे गटाबरोबर होते. ते गुवाहाटीलाही गेले होते. शिंदे गटाशी त्यांचे जवळचे संबंध असून ते त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यामुळे कालचा विस्तार बघितल्यानंतर त्यांना ‘हे धोका देणाऱ्याचं राज्य’ अशा अंदाज आला असेल. तसेच जे महादेव जानकर यांच्या पक्षासोबत झालं ते प्रहारबरोबर होऊ नये, अशी चिंताही त्यांच्या मनात असेल”, असा खोचक टोला रोहित पवार यांनी आमदार बच्चू कडू यांना लगावला आहे. तसेच आमच्यासारख्या आमदारांकडे बघितल्यानंतर अनेक लोक आम्हाला म्हणातात की, जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष न देता फक्त सत्ता कोणाची असेल याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष असते. कोणत्याही पक्षाला सध्या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे बच्चू कडू काय म्हणातात, यापेक्षा जनता काय म्हणते, हे जास्त महत्त्वाचं आहे, असेही ते म्हणाले.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?