भारतात सर्वांना करोनाची लस मोफत मिळणार, केंद्रीय मंत्र्यांनी केलं स्पष्ट

बिहारमध्ये करोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली होती…

देशातील सर्व जनतेला करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस मोफत मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी जाहीर केले आहे. बिहारमध्ये करोनावरील लस मोफत देण्याच्या भाजपाच्या घोषणेवरुन मोठा वाद सुरु आहे. भाजपाने मागच्या आठवडयात प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून करोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली. त्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभा निवडणूक असलेल्या बिहारमध्येच नाही, तर सर्वात मोफत लस मिळाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. प्रत्येक व्यक्तीच्या लशीकरणारवर सरकार ५०० रुपये खर्च करेल, असे प्रताप सारंगी म्हणाले. सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याचे सारंगी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी २० ऑक्टोबरला देशाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भारतीय शास्त्रज्ञ वेगवेगळया लशी बनवत असून, त्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत असे म्हणाले होते. प्रताप सारंगी हे पशुसंवर्धन, डेअरी, मासळी खात्याचे राज्यमंत्री आहेत. ओदिशाच्या अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी लस सर्वांना मोफत मिळणार असल्याचे सांगतिले.

हे वाचले का?  Tahawwur Rana Extradiction : २६/११ मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा डिसेंबर अखेरीस भारताच्या ताब्यात?