भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी स्नेसारेव्ह

दोन वर्षेआधी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्नेसारेव्ह यांची सप्टेंबपर्यंत पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे.

बेलारूसच्या निकोलाय स्नेसारेव्ह यांची भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) नियुक्ती केली आहे. दोन वर्षेआधी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्नेसारेव्ह यांची सप्टेंबपर्यंत पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे.

मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंना ते मार्गदर्शन करतील. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला ३००० मीटर स्टिपलचेस धावपटू अविनाश साबळेला ते मार्गदर्शन करत आहेत. तसेच ऑलिम्पिककरिता पात्र ठरण्यासाठी उत्सुक असलेल्यांनाही ते मार्गदर्शन करतील.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी स्नेसारेव्ह यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. ‘‘स्नेसारेव्ह यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची साबळेची इच्छा होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साबळेची कामगिरी उंचावण्याची आशा आहे,’’ असे सुमारीवाला म्हणाले.

‘‘भारतासोबत याआधी स्नेसारेव्ह यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्यामुळे ललिता बाबर हिला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अव्वल १० जणांमध्ये धडक मारता आली. त्याचबरोबर सुधा सिंह हिनेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम कामगिरी केली आहे,’’ असेही सुमारीवाला यांनी सांगितले. २००५पासून स्नेसारेव्ह भारतीय अ‍ॅथलेटिक्सशी जोडले गेले आहेत.

हे वाचले का?  Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…