भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप

राजा आणि डोंगरे कोणत्याही राज्य संघटनेवर निवडून आले नसल्याने मतदार यादीत त्यांचे नाव नाही

चेन्नई :  अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची (एआयसीएफ) निवडणूक ४ जानेवारी रोजी रंगत असून भारतसिंह चौहान आणि वेंकटरामा राजा या दोन्ही गटांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अध्यक्षपदाच्या रिंगणात असलेल्या राजा गटाने क्रीडा धोरणाचे उल्लंघन केल्याचा आरोप विद्यमान सचिव चौहान यांनी केला आहे.

राजा तसेच सचिवपदासाठी उभे असलेले महाराष्ट्राचे रवींद्र डोंगरे हे कोणत्याही राज्य संघटनेवर निवडून आले नसल्याने त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. मतदारांच्या यादीत त्यांचा समावेश नाही, असा दावा चौहान यांनी केला आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

‘‘राजा आणि डोंगरे कोणत्याही राज्य संघटनेवर निवडून आले नसल्याने मतदार यादीत त्यांचे नाव नाही. मतदार यादीत नाव असलेल्यांनाच ‘एआयसीएफ’ची निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो,’’ असे चौहान यांनी म्हटले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्त न्यायमूर्ती के. कन्नन यांनी राजा आणि डोंगरे यांची उमेवदारी रद्द ठरवावी, अशी विनंती दुसऱ्यांदा सचिवपदासाठी उत्सूक असलेल्या चौहान यांनी केली आहे.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

कन्नन यांनी १५ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणूक अधिकारी शनिवारी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून अंतिम यादी सादर करतील. चौहान आणि राजा गटाकडून प्रत्येकी अध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्षपदासाठीच्या सहा आणि सहसचिवपदासाठीच्या पाच जागांसाठी अर्ज भरले आहेत. ३२ राज्य संघटनांच्या दोन प्रतिनिधींना मतदानाचा हक्क असेल.

२८ राज्य संघटनांमधील प्रतिनिधींनी विविध पदांसाठी अर्ज केले आहेत. आपल्याला १४ संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा चौहान गटाने केला आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन