मजुरांचे बचावकार्य ठप्प,गुरुवारपासून कोणतीही प्रगती नाही; १५ मीटरचे खोदकाम अपूर्ण

सिलक्यारा बोगद्यामध्ये पाइप टाकण्याच्या कामामध्ये गुरुवारपासून कोणतीही प्रगती झाली नसल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे (एनडीएमए) शुक्रवारी देण्यात आली.

पीटीआय, उत्तरकाशी

सिलक्यारा बोगद्यामध्ये पाइप टाकण्याच्या कामामध्ये गुरुवारपासून कोणतीही प्रगती झाली नसल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे (एनडीएमए) शुक्रवारी देण्यात आली. बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी अजूनही १५ मीटर ढिगाऱ्यातून खोदकाम शिल्लक असल्याचे एनडीएमएने दिली.

मजुरांची सुटका कधी होईल याबद्दल माध्यमांनी कोणतेही अंदाज वर्तवू नयेत असे आवाहनही एमडीएमएमार्फत करण्यात आले. बोगद्यामध्ये १३ दिवसांपासून ४१ मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी ढिगाऱ्यातून खोदकाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाइप आतमध्ये टाकले जात आहेत. मात्र, या कामात सातत्याने तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे अडथळे येत असल्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

ऑगर यंत्राद्वारे खोदकामाला लवकरच सुरुवात होईल अशी आशाही एनडीएमएकडून व्यक्त करण्यात आली. त्यापूर्वी बचावकार्य लवकरच सुरू होईल अशी आशा शुक्रवारी सकाळी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पुढे काहीच प्रगती झाली नाही. ऑगर यंत्राला आधार देण्यासाठी २५ टनांचे व्यासपीठ दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्यामुळे बचावकार्य थांबले आहे.बोगद्याच्या तोंडाजवळ तुटलेल्या पाइपचे तुकडे लहान भागांमध्ये काढण्याचे काम हाताने करावे लागत आहे, त्यानंतर ऑगर यंत्राद्वारे पुन्हा खोदकामाला सुरुवात होईल. त्यानंतर दोन किंवा तीन अतिरिक्त पाइप एकमेकांना वेिल्डग करून जोडले जातील आणि जॅक ड्रिल व पुढे ढकलण्याच्या पद्धतीने पुढे पाठवले जातील. या संपूर्ण प्रक्रियेला काही तास लागतील. काही अडथळे आले नसते तर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता.

हे वाचले का?  त्रुटींसाठी निकष लावा, सुविधा द्या! केंद्राच्या उच्चस्तरीय परीक्षा सुधारणा समितीकडे सूचनांचा ओघ

जमिनीवरील रडारने असे सूचित केले आहे की पुढील पाच मीटपर्यंत कोणताही धातूचा अडथळा नाही अशी माहिती बचाव कार्यासाठी असलेले राज्याचे नोडल अधिकारी नीरज खैरवाल यांनी दिली. खोदकाम केलेल्या भागातून स्टीलचे पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) जवान बचावमार्गातून अडकलेल्या मजुरांना स्ट्रेचरने बाहेर काढतील. मात्र, अनपेक्षितरित्या कधीही अडथळे येऊ शकतील असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई