महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; राहुल, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्रातही काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे.

देशातील बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसतर्फे आज देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवास्थानाला घेराव घालणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीं, प्रियांका गांधीसह पक्षाचे अनेक नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा पोलिसांनी रोखला आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रातही सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विधानभवन परिसरातून काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध

आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घातल केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदवला आहे. जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचं काम आहे. मात्र, पोलिसांकडून काँग्रेस काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना मारहाणही करण्यात आला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत काढलेला मोर्चा पोलिसांनी रोखत त्यांना ताब्यात घेतलं आहे.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

राहुल गांधीची केंद्र सरकारवर टीका

“विरोधी पक्षांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही. केंद्र सरकारविरोधात जेवढं मी बोलेन तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी कारवाईला घाबरत नाही. जो धमकावतो तोच घाबरतो. हे लोक २४ तास खोटं बोलण्याचे काम करतात. त्यांना महागाई आणि बेरोजगारीसोबत दिलेल्या आश्वसानाचीही भीती वाटत” असल्याची टीका राहूल गांधींनी केली