महानगरांना कांदा रडविणार ? नाशिकमध्ये सोमवारपासून लिलाव बंद

केंद्र सरकारने कांद्यावर अकस्मात निर्यात शुल्क लागू करताना स्पष्टता केली नसल्याने परदेशात जाणारा माल बांग्लादेश सीमा व बंदरात अडकून पडला आहे.

नाशिक – केंद्र सरकारने कांद्यावर अकस्मात निर्यात शुल्क लागू करताना स्पष्टता केली नसल्याने परदेशात जाणारा माल बांग्लादेश सीमा व बंदरात अडकून पडला आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने घेतला. यामुळे समित्यांमध्ये दैनंदिन होणारे ६० ते ७० हजार क्विंटलचे लिलाव थांबतील. याचा फटका मुख्यत्वे महानगरांना बसणार आहे.