महाराष्ट्रात दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

मागील २४ तासांमध्ये ७५ मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात ५ हजार १११ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ४२ हजार १९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४५ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ४ हजार ९८१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका झाला आहे.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १४ लाख ४७ हजार ७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६४ हजार ३४८ नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४३ हजार ९१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ५ हजार १०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार १६६ रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४ हजार ९८१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ इतकी झाली आहे.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

आज नोंद झालेल्या ७५ मृत्यूंपैकी ६३ मृत्यू हे मागील ४८ तासातले आहेत. तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.