महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ; कॅश फॉर क्वेरी प्रकरणात CBI गुन्हा दाखल करणार, लोकपालांकडून तपासाचे आदेश

पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला मोइत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आलं. मोइत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. महुआ मोइत्रा आता पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. टीएमसीने त्यांना पश्चिम बंगालमधील कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. दरम्यान, मोइत्रा यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला मोइत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सीबीआय आता मोइत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. याशिवाय लोकपालांनी सीबीआयला सहा महिन्यांच्या आत यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचले का?  Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

लोकपालांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, सध्या आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीचं सावधपणे विश्लेषण आणि विचारमंथन करूनच मोइत्रा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. मोइत्रा यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप योग्य आहेत आणि यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही. त्यांच्याविरोधातले अनेक पुरावे आमच्यासमोर आहेत. हे एक गंभीर प्रकरण असल्याने, तसेच त्यांच्या पदाचा विचार करता आम्हाला वाटतं की, या प्रकरणातलं संपूर्ण सत्य बाहेर यावं. त्यासाठी याप्रकरणाचा तपास करणं आवश्यक आहे.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन