“माझं संरक्षण काढलं आणि दोन तासांत…”, भास्कर जाधवांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप!

भास्कर जाधव म्हणतात, “जे आज आम्हाला नीतीमत्तेचे धडे देत आहेत, त्या भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना…!”

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकारानंतर चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी या सर्व गोष्टींसाठी एकनाथ शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी गंभीर आरोप केला आहे.

नेमकं काय घडलं चिपळूणमध्ये?

मंगळवारी कुडाळमध्ये भास्कर जाधव यांनी भाषण करताना नारायण राणे आणि नितेश व निलेश या त्यांच्या दोन्ही पु्त्रांवर टीका केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे गटालाही लक्ष्य केलं. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा भास्कर जाधव मुंबईला परतल्यानंतर त्यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं गेलं. यासंदर्भात पाहणी केली असता त्यांच्या घराच्या आवारात दगड, स्टम्प आणि काचेच्या बाटल्या आढळून आल्या. या पेट्रोलच्या बाटल्या असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, यावरून आता भास्क

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

“मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या संरक्षणासाठी पोलिसांचा फौजफाटा होता. रात्री ११ ते १२च्या दरम्यान माझी सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली. प्रत्येक आमदाराला किमान एक किंवा दोन पोलीसांची तरी सुरक्षा असते. पण माझ्यासाठी एकही पोलीस ठेवला नाही. चिपळूण आणि मुंबईतील माझ्या राहत्या घरासमोरचं संरक्षण काढून घेतलं”, असं भास्कर जाधव म्हणाले.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

“दोन तासांत हल्ला होतो याचा अर्थ..”

“माझी सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत माझ्या घरावर हल्ला होतो, याचा अर्थ हा हल्ला सरकारच्याच सहकार्याने गुंडांनी केलाय हे स्पष्ट झालं आहे”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.