मेटा, गुगल आणि अ‍ॅमेझॉननंतर आता ‘या’ मोठ्या कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा! सात हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

मागील काही महिन्यांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे.

मागील काही महिन्यांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. ट्विटर, मेटा, अ‍ॅमेझॉन आणि गुगल यांसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्माचारी कपातीचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता डिझनेही जगभरातील कर्मचाऱ्यांची संख्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात बोलताना, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर म्हणाले, करोनामुळे आम्हाला मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे आम्ही जगभरातील सात हजार कर्माचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं आमच्यासाठी सोप्पा नाही. मला माझ्या कर्मचाऱ्याची प्रतिभा आणि त्यांच्या कामाच्या समर्पणाबद्दल अभिमान आहे. या निर्णयामुळे त्यांच्या वयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होईल? याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, आम्हाला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागतो आहे.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

डिझनेमध्ये जगभरात सुमारे दोन लाख २० हजार कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी एक लाख ६६ हजार कर्मचारी एकट्या अमेरिकेत कार्यरत आहेत. यापैकी जगभरातील सात हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय डिझनेने घेतला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली होती. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि amazon.com इंकने जवळपास १० हजार कर्माचाऱ्यांची कपात सुरु केली. तसंच ट्विटर इंकने त्यांच्या ७ हजार ५०० कर्मचाऱ्यांमध्ये अर्ध्याहून अधिक जणांना कामावरून काढून टाकलं. तर सिस्को सिस्टम इंकने मागच्या आठवड्यात नोकरी आणि कार्यालय कमी करण्याची घोषणा केली. हाय ड्राईव्ह निर्माता सिगेट टेक्नोलॉजी होल्डिंग्स पीएलसीनेही जवळपास तीन हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात केली होती.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार