युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनीच रशियाचा रॉकेट हल्ला, २२ जणांचा मृत्यू

रशियानं बुधवारी युक्रेनमधील एका रेल्वे स्थानकावर रॉकेट हल्ला केला आहे.

 २४ ऑगस्ट रोजी युक्रेनचा ३१ वा स्वातंत्र्यदिन होता. रशियाच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनियन नागरिकांनी २४ ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करू शकतो, अशी शक्यता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी व्यक्त केली होती.

त्यामुळे युक्रेनमधील पूर्व नियोजित अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. झेलेन्स्की यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, रशियानं बुधवारी युक्रेनमधील एका रेल्वे स्थानकावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ जारी करत या घटनेची माहिती संयुक्त राष्ट्रांना दिली आहे. तसेच त्यांनी रशियानं केलेल्या या रॉकेट हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांत निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियानं बुधवारी पूर्व युक्रेनमधील रशियन-व्याप्त डोनेस्कच्या पश्चिमेस १४५ किमी अंतरावर असलेल्या चॅपलीन या छोट्याशा गावातील रेल्वे स्थानकावर रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

झेलेन्स्की यांचे सहाय्यक कायरिलो टायमोशेन्को यांनी सांगितलं की, रशियन सैन्याने चॅपलीन गावावर दोन वेळा रॉकेट हल्ला केला. पहिल्या हल्ल्यात क्षेपणास्त्र एका घरावर पडल्याने घरातील एक मुलाचा मृत्यू झाला. दुसरा रॉकेट हल्ला चॅपलीन येथील रेल्वेस्थानकावर करण्यात आला. त्यामुळे २१ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात रेल्वेचे पाच डबेही जळून खाक झाले आहेत.