येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर

येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

नागपूर : मान्सूनने रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमनाची वार्ता दिली. दरम्यान, येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी व कोल्हापूरचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरीकोटा, धुबरी येथून मान्सूनचा प्रवास सुरू आहे. येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे

येत्या ४८ तासांत मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिणमध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ईशान्य भागातील काही राज्य, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहार राज्यात मजल मारण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”