रक्षाबंधनासाठी बाजारपेठेत लगबग

भावाच्या मनगटावर खुलेल अशी परंतु, शास्त्र म्हणून रेशीम धाग्यात विणलेल्या राखीला महिलांकडून अधिक मागणी आहे.

नाशिक : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण उंबरठय़ावर आलेला असताना राखीसह अन्य भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठ परिसरात लगबग दिसू लागली आहे. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे.

भावाच्या मनगटावर खुलेल अशी परंतु, शास्त्र म्हणून रेशीम धाग्यात विणलेल्या राखीला महिलांकडून अधिक मागणी आहे. महिलांची ही आवड लक्षात घेता बाजारात पहिल्यांदाच किवी राखी आली. एडी ही कुं दन प्रकारातील राखी महिलांचे लक्ष वेधून घेत आहे. याविषयी राखी विक्रेते कै लास सोनवणे यांनी माहिती दिली.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

किवी म्हणजे कुंदन प्रकारातील राखी. याशिवाय जरदोसी, भय्या-भाभी, लुंबा असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत राखीचे दर वाढले असले तरी ग्राहकांच्या मागणीवर याचा परिणाम झालेला नसल्याचे सोनवणे यांनी नमूद के ले. पूजा राखीचे योगेश शहा यांनी बाजारपेठेत सध्या पाच रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत राखी उपलब्ध असल्याचे सांगितले. याशिवाय बालकांसाठी वेगवेगळ्या कार्टुन्ससह चॉकलेट राखीही बाजारात आली आहे. प्रकाशझोत असलेल्या राखीसाठी लहान मुले आग्रही आहेत. याशिवाय राखीत आपल्या भावाचे छायाचित्र टाकत त्याच्या नावाची राखी बनविण्याकडे महिलांचा कल आहे. बाजारपेठेत खरेदीचा उत्साह कायम असल्याचे शहा यांनी सांगितले.  दरम्यान, रक्षाबंधनानिमित्त बहिणीला सप्रेम भेट देण्यासाठी साडय़ा, गृहोपयोगी वस्तू, सोने-चांदीचे दागिने आदी खरेदीने वेग घेतला आहे.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीवर काळ्या झेंड्यांचे सावट