हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नगिरी जिल्ह्यत परतीच्या पावसाचे वातावरण गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झाले असून शुक्रवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्यच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सर कोसळल्या.
रत्नागिरी : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नगिरी जिल्ह्यत परतीच्या पावसाचे वातावरण गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झाले असून शुक्रवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्यच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सर कोसळल्या. शुक्रवारी दुपारपर्यंत कडक उन पडले होते. मात्र सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली. वीजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढत गेला. कार्यालयीन कामकाज पूर्ण करुन अनेक कर्मचारी घरी परतण्याच्या तयारीत असताना पावसाने गाठले.त्यामुळे अनेकांनी मिळेल तेथे आसरा घेतला. शहरातील रस्त्यांवरून थोडय़ाच वेळात पाण्याचे ओहोळ वाहू लागले. दिवसभर उष्म्याने त्रस्त रत्नगिरीकरांना गारव्याचा दिलासा मिळाला. ढगांचा गडगडाट रात्री उशीरापर्यंत चालू होता.
राजापूर, लांजा, संगमेश्व्र, चिपळूण इत्यादी तालुक्यांमध्येही गेले दोन दिवस दुपारनंतर वीजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. संगमेश्व्र, चिपळूण तालुक्यात त्याचा विशेष जोर होता . लांजा तालुक्यात सायंकाळी हलका पाऊस पडला. गेल्या १ जूनपासून शुRवारी ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यत एकूण सरासरी ३ हजार ४५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यची दीर्घकालीन वार्षिक सरासरी ३ हजार ३६४ मिलीमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत ४ हजार २०८ मिलीमीटर पाऊस पडला. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे हे प्रमाण जास्त होत
दरम्यान जिल्ह्यत उद्य, शनिवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रशांत महासागरातील वादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी भागात आगामी दोन दिवस मळभी वातावरण तयार होणार असून काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.