राज्यात थंडी परतणार

पुढील दोन दिवसांत थंडी हळूहळू वाढणार आहे. सध्या राज्यातील सर्वच भागातील किमान तापमान चढेच (सरासरीपेक्षा जास्त) असल्याचे दिसून येत असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

पुणे : राज्यावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून असलेले पावसाचे सावट आता पूर्णपणे कमी झाले आहे. पुढील दोन दिवसांत थंडी हळूहळू वाढणार आहे. सध्या राज्यातील सर्वच भागातील किमान तापमान चढेच (सरासरीपेक्षा जास्त) असल्याचे दिसून येत असल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे १५.२ अंश सेल्सिअस करण्यात आली. उत्तर भारतातील पंजाब राज्यात १७ आणि १८ डिसेंबर रोजी शीतलहर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  रायगड जिल्ह्यात ७५ टक्के लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्डच नाही

बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून भूपृष्ठभागाकडे आले आहे. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन ते पूर्णपणे शमले आहे. तर, उत्तर केरळपासून किनारपट्टीपर्यंत सलग असलेल्या चक्रीय स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. मंगळवारी मध्यपूर्व आणि वायव्य अरबी समुद्र ते उत्तर केरळ आणि कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. १५ डिसेंबरला या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. म्हणजेच या पट्ट्याचा प्रभाव दक्षिण भारतातील राज्यात जास्त राहणार असून राज्यात मात्र कोरडे हवामान राहणार आहे. परिणामी उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना असलेला अडथळा दूर होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडीचे पुनरागमन होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या राज्यातील सर्वच भागात किमान तापमानाचा पारा चढाच आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले