राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

Mumbai: Shiv Sena President Uddhav Thackeray with NCP chief Sharad Pawar and Maharashtra Congress president Balasaheb Thorat after he was chosen as the nominee for Maharashtra chief minister's post by Shiv Sena-NCP-Congress alliance, during a meeting in Mumbai, Tuesday, Nov. 26, 2019. (PTI Photo) (PTI11_26_2019_000294A) *** Local Caption ***

मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर करताना आणखी काही बाबतीत दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे असल्याने चिंता कायम आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनलॉक प्रक्रियेदरम्यान अत्यंत सावधपणे पावले टाकत आहेत. राज्यात अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे रेस्टॉरंटचालक आणि डबेवाल्यांना दिलासा देण्यात आला आहे. त्याचवेळी रेल्वे प्रवासावर लक्ष केंद्रीत करताना महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. लोकल पूर्ववत कधी सुरू होणार हा प्रश्न कायम असला तरी त्या दिशेने महत्त्वाची पावले टाकली जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

हे वाचले का?  ‘आनंदाचा शिधा’ योजनेत पारदर्शकता; ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात; ठेका मिळविण्यासाठी नऊ कंपन्या स्पर्धेत

लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार बहुप्रतीक्षित हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार खुले होणार आहेत. ५० टक्के क्षमतेने ते चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पर्यावरण विभागाकडून स्वतंत्र गाइडलाइन्स जारी करण्यात येणार आहेत. त्यात कोणती खबरदारी घ्यायची आहे, याबाबत निर्देश देण्यात येणार आहेत. राज्यातंर्गत रेल्वेसेवेला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तत्काळ प्रभावाने करोनाबाबतचे नियम व अटी पाळून रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात मुंबई-पुणे रेल्वेसेवेला परवानगी देण्यात आल्याने हजारो नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत लोकल धावत आहेत. या लोकलच्या संख्येत वाढ करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

राज्यात शाळा, कॉलेज, अन्य शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस तूर्त बंदच राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, मॉलमधील थीएटर्स, ऑडिटोरियम, सभागृहे याबाबतही तूर्त कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य सरकारकडून मुंबईच्या डबेवाल्यांनाही खूप मोठा दिलासा देण्यात आला आहे. डबेवाले आता लोकलमधून प्रवास करू शकणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात ते लोकलने प्रवास करू शकतील. त्यासाठी त्यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातून क्यूआर कोड घ्यावा लागणार आहे.

हे वाचले का?  अतिवृष्टीमुळे रायगडला पुराचा तडाखा; महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती