राज्यातील सहा जिल्ह्यांना आज ‘ऑरेंज अलर्ट’; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, १७ सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम

या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

नागपूर: ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये जोरदार “कमबॅक” केल्याने शेतकऱ्यांसह सारेच सुखावले आहेत. या पावसामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे. तसेच शनिवारी राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. गोकुळ अष्टमीनंतर राज्यात पाऊस सक्रीय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सर्वत्र जलधारा कोसळत आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

तसेच कोयनासह राज्यातील इतर धरणांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. यामुळे पावसाची असलेली चिंता आता मिटली आहे. पावसाचा जोर अजून काही दिवस राहणार आहे.

“ऑरेंज अलर्ट” असणारे जिल्हे कोणते?

राज्यातील सहा जिल्ह्यांना शनिवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात पुणे, सातारा, रत्नागिरी, ठाणे, नाशिक, पालघरचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर सर्व भागांत पावसाचा “यलो अलर्ट” दिला आहे. नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचा परिणाम अरबी समुद्रालाही जाणवत आहेत. राज्यात १७ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील दोन दिवस अजून राज्यात सर्वत्र पाऊस आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असून पुन्हा १४ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.