राज्यातील ७० हजार आशा काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात; काय आहेत करणे…

आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्टकांची ओळख आहे. घरोघरी भेटी देणे, आरोग्य तपासणी, माता बाळांची काळजी घेणे यासह जवळपास ७२ प्रकारची कामे आशांना करावी लागतात.

वाशीम : ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आशा स्वयंसेविका, गत प्रवर्तक नित्य नेमाने सेवा बजावित आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने वाशीम सह राज्यातील ७० हजार अशा स्वयंसेविका काम बंद आंदोलन करण्याचा तयारीत असून बेमुदत संपावर आहेत. त्यांना ४ हजार गट प्रवर्तकाचा पाठिंबा असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे वाचले का?  ST Strike : महाराष्ट्रात लाल परीची चाके थांबली, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे, पुण्यात काय स्थिती?

आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्टकांची ओळख आहे. घरोघरी भेटी देणे, आरोग्य तपासणी, माता बाळांची काळजी घेणे यासह जवळपास ७२ प्रकारची कामे आशांना करावी लागतात. ग्रामीण भागातील नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांची मात्र सरकार काळजी कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आशा, गट प्रवर्तक यांना वेतनातील अर्धे वेतन फक्त गाठी,भेटी वर खर्च करावा लागतो. त्यांना दिलेल्या ॲपवर इंग्रजी भाषा असल्याने माहिती नमूद करताना अडचणी येतात.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

शासन सेवेत असल्याने वेतन श्रेणी, वार्षिक वेतनवाढ बोनस गट प्रवर्तक महिलांना देण्यात यावे, आशा यांना ऑनलाईन कामे देऊ नये, दिवाळी पूर्वी बोनस द्यावे, केंद्राने मोबदल्यात वाढ करावी, किमान वेतन लागू करावे, यासह इतर मागण्यासाठी आशा, गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारला आहे. यामधे जिल्ह्यासह राज्यातील कर्मचारी सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.