रुग्णांच्या नातेवाइकांची ‘प्लाझ्मा’साठी धावपळ

राज्यापाठोपाठ शहरातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना रुग्णांच्या नातेवाइकांची रक्तद्रव (प्लाझ्मा) मिळवण्यासाठी दमछाक होत आहे

राज्यापाठोपाठ शहरातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना रुग्णांच्या नातेवाइकांची रक्तद्रव (प्लाझ्मा) मिळवण्यासाठी दमछाक होत आहे, मात्र त्याचवेळी गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार परिणामकारक नसल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने स्पष्ट के लेले असताना, शिवाय प्लाझ्माच्या वापराशिवायही रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत असताना प्लाझ्मासाठी यातायात करणे अनावश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

शहरातील कमी झालेली करोना रुग्णांची संख्या फे ब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यात सलग चार दिवस शहरातील रुग्णसंख्येने वर्षभरातील दैनंदिन रुग्णसंख्येचे उच्चांक मोडले आहेत. ही वाढ दिसण्यास सुरुवात झाल्यानंतर रुग्णांवरील उपचारांसाठी प्लाझ्माची मागणी वाढत असल्याचे निरीक्षण रक्तपेढ्यांकडून नोंदवण्यात आले आहे. रक्ताचे नाते ट्रस्टचे संस्थापक राम बांगड म्हणाले,की शहरात रक्तद्रव मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. शिवाय करोनाची पहिली लाट असताना ज्यांना संसर्ग होऊन गेला, त्यांपैकी बहुसंख्य करोनामुक्त रुग्णांनी मागील सहा महिन्यात अनेकवेळा रक्तद्रव दान के ले आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरातील प्रतिपिंडे कमी झाली आहेत. गरजूंना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील रक्तपेढ्यांनी सर्व रक्तगटांच्या प्लाझ्मा दात्यांची माहिती आणि संपर्क  क्रमांकांची यादी तयार ठेवली आहे. गरजू रुग्णाचा रक्तगट पाहून त्याप्रमाणे रक्तद्रव दात्यांना संपर्क  के ला जातो ,अशी माहिती बांगड यांनी दिली.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

रुबी हॉल क्लिनिकच्या करोना उपचार विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे म्हणाले,की अतिदक्षता विभागातील करोना रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा उपचारांचा उपयोग नाही हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ऑक्टोबर २०२० मध्ये, म्हणजे पहिल्या लाटेदरम्यान संशोधनाअंती स्पष्ट के ले आहे. त्यामुळे प्लाझ्मा मिळवण्यासाठी यातायात का के ली जाते हे समजत नाही. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा वापर प्रयोग म्हणून करण्यास परवानगी आहे, त्याची परिणामकारकता सिद्ध झालेली नाही. शिवाय, आता तब्बल एक वर्षानंतर करोना रुग्णांवर करावयाच्या उपचारांची रूपरेषा (प्रोटोकॉल) स्पष्ट झाली आहे, त्यामुळे प्लाझ्मा वापराची आवश्यकता वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले.