लडाख: भारत-चीन सैन्य माघारी बाबत राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली महत्त्वाची माहिती

टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने काल जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी आज संसदेत लडाखमधील स्थिती संदर्भात माहिती दिली. “चीन बरोबर झालेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य माघारीचा निर्णय झाला आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल” असे राजनाथ यांनी सांगितले. दोन्ही बाजू पद्धतशीरपणे फॉरवर्ड बेसवरुन माघार घेतील. मुत्सद्दी पातळीवर ठरल्यानंतर दोन्ही देश पुन्हा गस्त सुरु करतील असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. (सविस्तर वृत्त लवकरच)

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक