लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू

उच्चांकी दर मिळाळेल्या लसणाच्या दरात निम्म्याने घट झाली आहे. नवीन लसणाचा हंगाम सुरू झाला असून, मध्यप्रदेशातून लसणाची आवक वाढली आहे.

पुणे : उच्चांकी दर मिळाळेल्या लसणाच्या दरात निम्म्याने घट झाली आहे. नवीन लसणाचा हंगाम सुरू झाला असून, मध्यप्रदेशातून लसणाची आवक वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी एक किलो लसणाचे दर ४०० रुपये किलोपर्यंत होते. नवीन लसणाची आवक सुरू झाल्यानंतर दरात घसरण झाली आहे.

किरकोळ बाजारात एक किलो लसणाला प्रतवारीनुसार २०० ते २५० रुपये दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर ४०० रुपये किलो होते. लसूण दरातील तेजीची झळ गृहिणींना सोसावी लागत होती. पाव किलो लसणाचे दर १०० रुपयांपर्यंत होते. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारात दररोज २० ते ३० टन लसणाची आवक होत आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

परराज्यातील लसणावर भिस्त

महाराष्ट्रात गावरान लसणाची लागवड कमी होत असल्याने परराज्यातील लसणाला मागणी वाढली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.

लसणाच्या दरात आणखी घट

लसणाचा नवीन हंगाम सुरू झाला असून, मध्यप्रदेशातील लसणाची आवक वाढली आहे. थंडी ओसरल्यानंतर परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू होतो. पुढील तीन ते चार महिने लसणाची मोठी आवक होणार आहे. दरात आणखी घट होणार आहे.- विलास भुजबळज्येष्ठ अडतेश्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

हे वाचले का?  Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

लसणाचे दर

● घाऊक बाजारात दहा किलोचे दर- १००० ते १६०० रुपये

● किरकोळ बाजारात एक किलोचे दर – २०० ते २५० रुपये