लाच घेणाऱ्या जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर फरार

झनकर यांच्या दालनात पथकाकडून चौकशी करण्यात येत होती.

न्यायालयात अनुपस्थित

नाशिक : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी येथे आठ लाख रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर दुसऱ्या दिवशी फरार झाल्याचे उघड झाले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर रहावे लागणार असतांना त्या फरार झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. झनकर यांनी शाळांना २० टक्के  अनुदान मिळण्याविषयीच्या प्रस्तावा संदर्भात शिक्षकांकडे नऊ लाख रुपयांची मागणी के ली होती.

याबाबत संबंधिताने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रोर के ली. पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचला. साडेपाचच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर झनकर यांचा वाहनचालक ज्ञानेश्वर येवले हा पैसे स्विकारतांना पथकाने त्यास पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने झनकर यांचे नाव घेतले. झनकर यांच्या दालनात पथकाकडून चौकशी करण्यात येत होती.

हे वाचले का?  नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

सायंकाळी उशीरा राजेवाडी येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यालाही ताब्यात घेण्यात आले. सुमारे आठ तास झनकर यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर संशयित दशपुते आणि येवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांना अंधार पडल्यावर अटक करता येत नसल्याने झनकर यांना अटक न करता समन्स बजावत सकाळी आठ वाजता भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याविषयी सांगण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. परंतु, बुधवारी त्या भद्रकाली पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्या की नाही, याविषयी पोलिसांनी माहिती दिली नाही. दुपारी त्या न्यायालयातही उपस्थित राहिल्या नाहीत.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

ठाण्याच्या पथकाने दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर के ले. परंतु, झनकर न आल्याने त्यांना फरार घोषित करत दोन्ही संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हा सर्व प्रकार संशयास्पद असून पोलीस तसेच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पथकात महिला अधिकारी आणि कर्मचारी असतांना झनकर यांना एकटे का सोडण्यात आले, आठ तास चौकशी के ल्यानंतरही ही बेफिकिरी का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. लाच देण्यासाठी शिक्षकांची वर्गणी शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांनी शाळेला २० टक्के  अनुदान मिळण्यासह अन्य मागण्यांसाठी ३६ शिक्षकांकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांची मागणी के ली होती. यातील ३२ शिक्षकांनी वर्गणी काढत आठ लाख रुपये जमा के ले. हेच पैसे घेऊनतक्रारदार हा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आवारात आला होता.