लाचखोर जीएसटी अधिकाऱ्यास पोलीस कोठडी

वस्तू व सेवा कर विभागाच्या इंदिरानगर कार्यालयात ४० हजार रुपये स्वीकारत असताना पाटील यांना पकडण्यात आले

नाशिक – चित्रीकरणासाठी आलेली वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर अधिकारी जगदीश पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत