वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण हवे; गृह राज्यमंत्र्यांची अपेक्षा

वाहतूक व्यवस्था स्मार्ट सिटीच्या वतीने नियंत्रित केली जात असून त्याचा अंकुश पोलिसांकडे हवा, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहरात स्मार्ट सिटी योजनेतंर्गत संथपणे काम सुरू आहे. वाहतूक व्यवस्था स्मार्ट सिटीच्या वतीने नियंत्रित केली जात असून त्याचा अंकुश पोलिसांकडे हवा, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली. शहरातील वाहतूक व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त करुन कदम यांनी शहरात रिक्षा थांबे अधोरेखीत करण्याची सूचना पोलिसांना केली. शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था या विषयी पोलीस प्रशासनाला काही निर्देश दिले.

हे वाचले का?  सांगली, नाशिकला पावसाने झोडपले; द्राक्ष, डाळिंबाला फटका; रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मंत्री कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना, अल्पवयीनांचा गुन्हेगारीत असणारा सहभाग, कुंभमेळा नियोजन याविषयी आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांची विक्री, साठे रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली. कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून पोलीस आयुक्तालयातील सिंहस्थ कक्षाचा विस्तार करण्याचे आश्वासन कदम यांनी दिले. महायुतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती झाली. राज्य शासन कुठल्याही परिस्थितीत वाळू माफियांना पाठीशी घालणार नाही, असेही कदम यांनी नमूद केले.

हे वाचले का?  प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार

आणखी वाचा-

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाविषयी वरिष्ठ निर्णय घेतील. रायगडात आमचे तीन आमदार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. संख्याबळानुसार तसेच भरत गोगावले ज्येष्ठ असल्याने पालकमंत्रीपदावर आम्ही दावा करत आहोत. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष विस्तार करण्याची इच्छा आहे. त्यानुसार आमची मागणी आहे, असे कदम यांनी सांगितले.

हे वाचले का?  कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब