विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

बुधवारी राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. राज्यात बुधवारी (१८ ऑगस्ट) बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त के ली आहे, तर उत्तर महाराष्ट्रात नारंगी इशारा दिला आहे.

बुधवारी राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचा नारंगी इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील जालना, बीड, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा पिवळा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”!

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील पुण्यात तीन मिलिमीटर, जळगाव दोन मि.मी., महाबळेश्वर पाच मि.मी., नाशिक तीन मि.मी., तर सांगलीत दोन मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

कोकण विभागातील मुंबईत नऊ मि.मी., मराठवाड्यातील औरंगाबादेत दोन, तर परभणीत १९ मि.मी. पाऊस पडला. विदर्भात अकोल्यात ११ मि.मी., चंद्रपूर सात मि.मी., गोंदिया चार मि.मी., नागपुरात १६ मि.मी., तर वर्ध्यात दहा मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधित तापमान मालेगावात ३२.८, तर सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता