विवाह इच्छुक मुली हरतालिकेला गौर का घेतात? जाणून घ्या नेमके कारण…

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत पाळले जात असून आज घरोघरी हरतालिका पूजन आहे. विवाह इच्छुक मुली हरतालिकेला गौर का घेतात याबाबत अनेक पौराणिक कथा आहे.

नागपूर : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत पाळले जात असून आज घरोघरी हरतालिका पूजन आहे. विवाह इच्छुक मुली हरतालिकेला गौर का घेतात याबाबत अनेक पौराणिक कथा आहे. मात्र याबाबत अनेक मुलींना उत्सुकतासुद्धा आहे.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

याबाबत ज्योतिषाचार्य प्रीती राजंदेकर यांनी सांगितले, हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात. याशिवाय विवाह इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठीसुद्धा हे व्रत ठेवतात. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हरतालिका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही ठेऊ शकतात.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते अशी आख्यायिका आहे. हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशीही मान्यता असल्याचे राजंदेकर यांनी सांगितले