विशेष रेल्वे गाडय़ा सुरू होऊनही प्रवाशांच्या अडचणी कायम

सर्वसाधारण तिकीट विक्रीही नाही

सर्वसाधारण तिकीट विक्रीही नाही

मनमाड : काही दिवसांपासून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि करोनाची भीती कमी होत असतानाही रेल्वे प्रशासनाने

अद्यापही आधीच्या सर्व गाडय़ा पूर्ववत के लेल्या  नाहीत. निवडक काही गाडय़ांना विशेष गाडीचे नाव देऊन सेवा सुरू केल्याचे भासवले जात आहे. मात्र त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. सर्वसाधारण तिकीट विक्री आणि मासिक पास विक्री सुरू झालेली नसल्यामुळे प्रवाशांत तीव्र नाराजी आहे.

त्यातच रेल्वे अजूनही फक्त आरक्षित प्रवाशांसाठीच विशेष रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवेश देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे हे निर्बंध हटल्यानंतरही अद्याप स्वप्नच राहिले आहे. प्रवाशांच्या अडचणी, समस्यांमध्ये दिवसागणिक भर पडत आहे. या बाबत जबाबदार रेल्वे अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर राज्य सरकारची परवानगी मिळत नसल्याने रेल्वे प्रशासन अद्याप विनाआरक्षित तिकीट विक्री,

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

रेल्वेतील प्रवेश सुरू करीत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र मुंबईला लोकल सेवा सर्वासाठी सुरू करण्यात आली. राज्य सरकारने त्याला परवानगी दिली. सर्वसाधारण तिकीट विक्री लोकलसाठी खुली झाली. राज्यांतील लोकप्रतिनिधींनी शासनावर यासाठी दडपण आणल्यास सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवरून सर्वसाधारण प्रवाशांना मर्यादित गाडय़ांसाठी प्रवेश देऊ शकते.

सध्या अनेक विशेष रेल्वे गाडय़ांना केवळ आरक्षण असल्यामुळे २० ते २५ टक्केच प्रतिसाद मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसह इतर सर्व प्रकारच्या दिल्या जाणाऱ्या सवलती रेल्वेने सध्या काढून घेतल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे कधी सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नाशिकसह मनमाड आणि परिसरासाठी जीवनवाहिनी असलेल्या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी, मनमाड-इगतपुरी शटल, भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर या गाडय़ा कधी सुरू होणार याबाबत रेल्वे प्रशासन अद्यापही उत्तर देत नाही. दर दोन दिवसाआड काही विशेष गाडय़ा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येत असल्याचे प्रशासन जाहीर करते. मात्र या गाडय़ा जुन्याच आहेत. केवळ आरक्षण सक्तीचे असल्याने या गाडय़ांना आधीचे नाव देता येत नाही, अशी मल्लिनाथी त्यावर केली जात आहे. करोनाचे नियम पाळून आरक्षणाचे शुल्क लावून या गाडय़ा सुरू केल्या जात आहेत. सामान्य प्रवासी आणि दररोज ये-जा करणारे चाकरमानी, विद्यार्थी, व्यावसायिक मात्र अद्यपही रेल्वे प्रवासाला वंचित आहेत. रेल्वेसेवा पूर्ववत होत नसल्याने मनमाड परिसरातील चाकरमाने, व्यापाऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली