वीर माता-पिता, जखमी जवानांसह पदकप्राप्त पोलिसांचा गौरव

नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालय प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजवंदन भुजबळ यांचे हस्ते झाले.

जिल्हा परिषदेमार्फत आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार

नाशिक : येथील मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात वीर माता, पत्नी आणि पिता यांच्यासह कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या जवानांचा ताम्रपट देऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सुंदर गाव आणि आवास योजना, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे पुरस्कार, जनआरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणारी रुग्णालये, राष्ट्रपतीपदक, पोलीस पदकप्राप्त अधिकारी, कर्मचारी आदींचा गौरव करण्यात आला.

नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालय प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजवंदन भुजबळ यांचे हस्ते झाले. जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत स्क्वाड्रन लिडर निनाद मांडवगणे शहीद झाले. त्यांच्या वीर पत्नी, वीर माता आणि पिता यांना महाराष्ट्र शासनातर्फे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. नायक नीलेश अहिरे हे ‘ऑपरेशन रक्षक’ दरम्यान जम्मू-काश्मीर येथे भूसुरुंग स्फोटात जखमी झाले. त्यांना अपंगत्व आले. शासनाने साडेआठ लाख रुपयांची मदत दिली आहे. भोकरे धुडकू यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना अपंगत्व आले. महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये आर्थिक मदत दिली असून या सर्वाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसएमबीटी महाविद्यालय, नामको हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सहाय्यक उपनिरीक्षक अनंता पाटील, हवालदार संतु खिंडे, उपनिरीक्षक अशोक अहिरे यांच्यासह उल्लेखनीय कामगिरीबद्दल पदक मिळवणाऱ्या सुदर्शन आवारी, हवालदार प्रवीण कोकाटे, सगुन साबरे, महिला पोलीस प्रीती कातकाडे, गणेश फड, मिलिंद तेलुरे, शेख मोहम्मद नजिम, अब्दुल रहेमान, अंबादास जाडर, साधना खैरनार या शहर व ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्यावतीने पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना प्रशिक्षण शाखेतील कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्रीपदक तर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

हे वाचले का?  द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल बागलाण, देवळा, त्र्यंबकेश्वर, सर्वोत्कृष्ट आवास योजनेबद्दल गिरणारे, साकोरे व वाघेरा क्लस्टर, आवास योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत दिंडोरीतील देवपाडा, मालेगावमधील चिंचवे व बालगाणमधील शेवरे ग्रामपंचायत, आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट संस्था येवल्यातील जनता नागरी सहकारी बँक, बागलाणमधील बँक ऑफ बडोदा, सटाणा येथील आयडीबीआय बँक यांना गौरविण्यात आले. राज्य पुरस्कृत आवास योजनेत सिन्नर, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून येवल्यातील राजापूर, इगतपुरीतील नांदगाव सदो व अंजनेरी तर जामोठी, अंगुळगाव व बोर्ली या ग्रामपंचायतींनी पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट वित्तसंस्थेत बागलाणमधील एसबीआय, नाशिकमधील गुरुकृपा महिला स्वयंसहाय्यता, नाशिक समूह, साडगाव आणि येवला तालुक्यातील बँक ऑफ बडोदाची पाटोदा शाखा यांना गौरविण्यात आले.

ग्रामपंचायतींना पुरस्कार

जिल्हा परिषदेमार्फत आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत २०१९-२० व २०२०-२१ जिल्हा व तालुका सुंदर गाव ग्रामपंचायतींचे पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. २०१९-२० मध्ये आहेरगांव, चणकापूर, दातली, टेंभे खालचे, सोग्रस, धामणगाव, पाटोदा, जानोरी, ओढा, येसगाव बुद्रुक, रोहिले, रामेश्वर, मोहपाडा, नागापूर, तोंडवळ या गावांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. २०२०-२१ मधील ओझर, मेहदर, चिंचोली, नवे निरपुर, चांदवड नन्हावे, नागोसली, एरंडगाव खु, गोंडेगाव, कोटमगाव, बेळगाव, अंबोली, माळवाडी, म्हैसखडक, भालुर, बोरवड यांना पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले आहे.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्र मात पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करताना पालकमंत्री छगन भुजबळ