शनिवारी नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद

सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: गंगापूर आणि मुकणे धरणातील पाणी उचलणाऱ्या केंद्रातील वीज व्यवस्थेशी संबंधित देखभाल व दुरुस्तीचे काम शनिवारी केले जाणार आहे. त्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हे वाचले का?  मतदार याद्यांवरून मविआ – महायुतीत रणकंदन;मालेगावातील नावे नाशिक मध्य मतदारसंघात नोंदविल्याची भाजपची तक्रार

याबाबतची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. मुकणे धरणातील पाणी उचलणारे केंद्र (पंपिंग स्टेशन) येथील वीज कंपनीच्या व्यवस्थेतील दुरुस्ती कामे आणि उपकरणांची तपासणी शनिवारी करण्यात येणार आहे. तसेच गंगापूर धरणातून पाणी उचलणाऱ्या केंद्रात (पंपिग स्टेशन) अत्यावश्यक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

परिणामी शनिवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन या विभागाने केले आहे.