“शरद पवार मोठे नेते, पण…”, ‘त्या’ विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

“आम्ही महाराष्ट्रातील जनतेचे…”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला खडसावलं होतं. सत्ता आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. आता सत्ता आलेल्यांची विधानं वेगळी आहेत. काही लोकं तुरुंगात टाकणार, तर काही जामीन रद्द करु, असा इशारा देत आहेत. मात्र, ही राजकीय नेत्यांची कामं नाहीत, असा शरद पवार यांनी म्हटलं होतं. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचले का?  “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा

जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंना शरद पवारांनी केलेल्या टीकेवर विचारण्यात आलं. तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार मोठे नेते आहेत. आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. आज आणि उद्याही कार्यकर्ते म्हणून काम करणार आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेचे सेवक म्हणून काम करतोय,” असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.

शरद पवारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलं आहे. “आमचा संपर्क जमिनीवरील लोकांशी आहे. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालतो. त्यामुळे नेमकं हवेत कोण आहे, हे शरद पवार यांनी तपासावे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

“राहुल गांधींविषयी वातावरण दूषित करणाऱ्या…”

‘भारत जोडो’ यात्रेबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, “केरळपासून काश्मीरपर्यंत यात्रा काढणं सोप्प नाही. राहुल गांधींनी ते साध्य करुन दाखवलं. ‘भारत जोडो’ यात्रेची सत्ताधिकाऱ्यांकडून टिंगळटवाळी करण्यात येत असली तरी, यात सामान्य माणूसही सहभागी झाला आहे. राहुल गांधींविरोधात वातावरण दूषित करणाऱ्या भाजपाला उत्तर मिळाले,” असं शरद पवारांनी सांगितलं.

हे वाचले का?  Manoj Jarange : “आरक्षण घेण्यासाठी आता एकच पर्याय”, मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “सत्तेत…”