शाळांना सुट्टी केव्हापासून? माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी केले जाहीर

यावर्षी दोन मे पासून सुट्टी सुरू होणार आहे. ती अकरा जूनपर्यंत राहणार असून, पुढील शैक्षणिक सत्र बारा जूनपासून सुरू होईल. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी हे जाहीर केले आहे.

वर्धा : उन्हाळा म्हणजे मुलांसाठी सुट्ट्यांचा आनंद. परीक्षा आटोपली की सुट्ट्या केव्हा लागणार याची मुलं आतूरतेने वाट बघत असतात. तर मुलांनो, यावर्षी दोन मे पासून सुट्टी सुरू होणार आहे. ती अकरा जूनपर्यंत राहणार असून, पुढील शैक्षणिक सत्र बारा जूनपासून सुरू होईल. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी हे जाहीर केले आहे.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

विदर्भातील उन्हाळ्याचा कालावधी लक्षात ठेवून पुढील सत्र सव्वीस जूनपासून सुरू होणार आहे. नववीपर्यंतचा, तसेच अकरावीचा निकाल तीस एप्रिलपर्यंत देणे अपेक्षित आहे. त्यानंतर सुद्धा लावता येईल. पण निकाल विद्यार्थी किंवा पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शाळेची असेल. उन्हाळी, दिवाळी, नाताळ किंवा अन्य सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा अधिक असू नये, असे निर्देश आहेत.