शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती

एका शिक्षकासह दोन कर्मचारी करोनाबाधित

एका शिक्षकासह दोन कर्मचारी करोनाबाधित

नाशिक : करोना काळात होणारा संसर्ग पाहता शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले असले तरी जिल्ह्य़ात विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती असल्याने शिक्षकांसह जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत एक शिक्षक तसेच दोन शिक्षके तर कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.

दोन वर्षांपासून करोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. करोना संसर्ग कमी होत असल्याचे लक्षात घेऊन करोनामुक्त अशा गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १५ जुलैपासून जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले. जिल्ह्य़ाच्या १५ तालुक्यांमध्ये आठवी ते १२ वीचे ३१५ वर्ग सुरू झाले असून एक हजार ७६७ शिक्षक, ५७१ शिक्षके तर कर्मचारी कामावर रुजू झाले. यामध्ये सहा हजार ५५ विद्यार्थी पटावर दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्ष तीन हजार १३३ विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत.

हे वाचले का?  Drishti IAS Institute : विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर कारवाई, महापालिकेने लावलं सील; कारण काय?

शाळा सुरू होत असतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शिक्षकांना करोना चाचणी बंधनकारक के ली. चाचणीत एका शिक्षकासह दोन शिक्षके तर कर्मचारी करोनाबाधित असल्याचे आढळले. करोनाबाधित शिक्षकांना अलगीकरण करत नियमानुसार शाळा १४ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. तसेच जे विद्यार्थी शाळेत आले असतील, त्यांचीही त्वरित करोना चाचणी करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

आठवी ते इयत्ता १२ वी शाळा सुरु करण्याचा आदेश दिला असला तरी अजून बऱ्याच शिक्षकांचे लसीकरण झाले नसून शासनाने त्वरित शिक्षक वर्गासाठी लसीकरणाचा वेगळा कोटा द्यावा, अशी तालुक्यातील शिक्षकांची मागणी आहे. तसेच विद्यार्थ्यांचेही लसीकरण गरजेचे असून त्याशिवाय शाळा सुरू करणे धोक्याची घंटा ठरू शकते.  शाळेत पन्नास टक्के शिक्षक हजेरी या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असतांना जिल्ह्यातील काही शाळा शंभर टक्के उपस्थितीची सक्ती करत असल्याचे गाऱ्हाणे अनेक वेळा शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे मांडले आहे.

शासन नियमांनुसार जिल्ह्य़ातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. चाचणीत तीन जणांचा अहवाल करोना सकारात्मक आला असून २२९ अहवाल प्रलंबित आहेत. ज्या ठिकाणी शिक्षक किं वा शिक्षके तर कर्मचारी करोना बाधित आढळले. तेथे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. शासकीय नियमांचे पालन होत आहे.

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

– वैशाली झनकर (माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद)