सकाळी उद्घाटन अन रात्री दुकान आगीत खाक

नाशिक जिल्हा परिसरात आगीचे सत्र सुरू असून अवघ्या चोवीस तासात आगीच्या चार हून अधिक घटना घडल्या.

नाशिक जिल्हा परिसरात आगीचे सत्र सुरू असून अवघ्या चोवीस तासात आगीच्या चारहून अधिक घटना घडल्या. शनिवारी मध्यरात्री सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावरील मिठाईच्या दुकानाला रात्री अचानक आग लागली. त्यात दुकान जळून खाक झाले असून अंदाजे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या मिठाईच्या दुकानाचे सकाळी उद्घाटन झाले आणि रात्री ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी पहाटेपासून जिल्हा परिसरात ठिकठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर येण्यास सुरूवात झाली. शनिवारी पहाटे खाजगी प्रवासी बसला शहरात येत असतांना मिरची चौफुली जवळ आग लागली. सप्तश्रृंगी गड परिसरातील रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसला अचानक आग लागली. मनमाड येथे सिलेंडरची वाहतुक करणारे वाहन पलटल्याने आग लागली. पिंपळगाव बसवंत टोलनाक्या नजीक मालवाहतुक वाहनाने अचानक पेट घेतला. याच घटनाक्रमात सिन्नर येथील येथील सरदवाडी रस्त्यावर शनिवारी रात्री उशीराने मिठाईचे दुकान आगीत सापडले. मूळचे राजस्थान येथील असलेले मिठालाल अण्णाजी माळी यांचे सरदवाडी रोडवरच मधुर मिठास नावाचे एक दुकान असून त्यांनी ही दुसरी शाखा सुरू केली होती. सरदवाडी रोडवर त्यांनी शनिवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते मिठाईच्या दुकानाचे थाटामाटात उद्घाटन केले. दिवसभर धावपळीत अन्नाचा एक कणही पोटात गेलेला नव्हता. त्यामुळे रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान मिठालाल जेवण करण्यासाठी घरी गेले. जेवण करून पुन्हा दुकानात यायचे अशा विचाराने दुकानालगतच्या गोडाऊनचे शटर त्यांनी अर्धवट बंद केले होते. मात्र जेवणाच्या ताटावर बसलेल्या मिठालाल यांनी पहिलाच घास तोंडात टाकला आणि दुकानाला आग लागल्याचा फोन आला. ते धावत पळतच दुकानाकडे आले.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

माजी नगरसेवक पंकज मोरे यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करीत कार्यकर्त्यांसह आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सिन्नर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने औद्योगिक वसाहत परिसरातील अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. दोन्ही बंबांनी जवळपास दीड तास कसोशीने प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. मात्र मिठाईचे दुकान जळून खाक झाले. सकाळी उद्घाटन आणि रात्री आगीत दुकान खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत साधारणत: दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण समजु शकले नाही.

जिल्हा परिसरात आगीचे सत्र सुरू असून अवघ्या चोवीस तासात आगीच्या चार हून अधिक घटना घडल्या. शनिवारी मध्यरात्री सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावरील मिठाईच्या दुकानाला रात्री अचानक आग लागली. त्यात दुकान जळून खाक झाले असून अंदाजे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या मिठाईच्या दुकानाचे सकाळी उद्घाटन झाले आणि रात्री ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या प्रकारा मुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

शनिवारी पहाटे पासुन जिल्हा परिसरात ठिकठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर येण्यास सुरूवात झाली. शनिवारी पहाटे खाजगी प्रवासी बसला शहरात येत असतांना मिरची चौफुली जवळ आग लागली. सप्तश्रृंगी गड परिसरातील रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसला अचानक आग लागली. मनमाड येथे सिलेंडरची वाहतुक करणारे वाहन पलटल्याने आग लागली. पिंपळगाव बसवंत टोलनाक्या नजीक मालवाहतुक वाहनाने अचानक पेट घेतला. याच घटनाक्रमात सिन्नर येथील येथील सरदवाडी रस्त्यावर शनिवारी रात्री उशीराने मिठाईचे दुकान आगीत सापडले. मूळचे राजस्थान येथील असलेले मिठालाल अण्णाजी माळी यांचे सरदवाडी रोडवरच मधुर मिठास नावाचे एक दुकान असून त्यांनी ही दुसरी शाखा सुरू केली होती. सरदवाडी रोडवर त्यांनी शनिवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते मिठाईच्या दुकानाचे थाटामाटात उद्घाटन केले. दिवसभर धावपळीत अन्नाचा एक कणही पोटात गेलेला नव्हता. त्यामुळे रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान मिठालाल जेवण करण्यासाठी घरी गेले. जेवण करून पुन्हा दुकानात यायचे अशा विचाराने दुकानालगतच्या गोडाऊनचे शटर त्यांनी अर्धवट बंद केले होते. मात्र जेवणाच्या ताटावर बसलेल्या मिठालाल यांनी पहिलाच घास तोंडात टाकला आणि दुकानाला आग लागल्याचा फोन आला. ते धावत पळतच दुकानाकडे आले.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

माजी नगरसेवक पंकज मोरे यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करीत कार्यकर्त्यांसह आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सिन्नर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने आैद्योगिक वसाहत परिसरातील अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. दोन्ही बंबांनी जवळपास दीड तास कसोशीने प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. मात्र मिठाईचे दुकान जळून खाक झाले. सकाळी उद्घाटन आणि रात्री आगीत दुकान खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत साधारणत: दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण समजु शकले नाही.