सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

दुपारपर्यंत जवळपास ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. तर सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गडावरील श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या नवरात्रोत्सवास उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटेपासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र, अलंकाराची विश्वस्तांच्या मुख्य कार्यालयात अलंकारांचे पूजन अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

जिल्हा न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापनेची महापूजा

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनीही हातभार लावलेला आहे. घटस्थापनेची मुख्य महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश देसाई, पालकमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, विश्वस्त बंडू कापसे, ॲड. ललित निकम, मनज्योत पाटील, प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, राजशिष्टाचार अधिकारी नितिन आरोटे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

६० हजार भाविकांनी घेतले दर्शन

दुपारपर्यंत ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. सुमारे १० हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा उत्सव दरम्यान दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा सुरु असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. सप्तशृंगगड परिसरात भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये, त्या दृष्टीने कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून २५६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. एकूण १७० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक कार्यरथ आहेत

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया