समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार लोकार्पण

पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किमीचा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाला मुहूर्त अखेर ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आज महामार्गाचा दौरा करणार असून यावेळी यासंबंधी अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किमीचा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार आहे.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

समृद्धी महामार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाचे काम विलंबाने सुरू आहे. असे असताना नागपूर ते सेलू बाजार, वाशीम या २१० किमीच्या टप्प्यातील १०० टक्के काम पूर्ण झालं आहे. निविदा सादर करण्यासाठी २५ एप्रिल अंतिम तारीख असून २ मेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून टोल यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण कऱण्याचं आव्हान सध्या आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हे ७०० किमी अंतर केवळ सात तासांमध्ये पार करता येणार आहे.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी