सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: portrait;hw-remosaic: false;touch: (0.34444445, 0.77708334);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 35;

गेल्या वर्षी ५७ गावांमध्ये एकच गणपती होता, यावर्षी आणखी २२ गावे यामध्ये सहभागी झाली आहेत.

सांगली : सांगली पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी जिल्ह्यातील ७९ गावांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी दिली. गेल्या वर्षी ५७ गावांमध्ये एकच गणपती होता, यावर्षी आणखी २२ गावे यामध्ये सहभागी झाली आहेत. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे, उपविभागीय आणि जिल्हा स्तरावर गणेश मंडळे आणि शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी ग्रामीण भागासाठी एक गाव, एक गणपती आणि शहरी भागासाठी एक वाॅर्ड एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे आवाहन करत अशा मंडळांना व गावांना विशेष पुरस्कार देण्याचे जाहीर केले. त्यास जिल्ह्यातील ७९ गावांतील कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली असून सर्व गावकरी या उत्सवात आनंदाने सहभागी झाले आहेत.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

नावरसवाडी, रसुलवाडी, भिलवडी स्टेशन, ऐनेवाडी, पोसेवाडी, धोंडगेवाडी, जाखिनवाडी, ढोराळे, आडसरवाडी, भिवघाट, करंजे, हिवरे, कुसबावडे, ताडाचीवाडी, बाणुरगड, धोंडेवाडी, मोही, रामनगर, भडकेवाडी, सुलतानगावे, बेणापूर, भुड, कळंबी, कामथ, बोंबेवाडी, गोमेवाडी, मिटकी, घुलेवाडी, मासाळवाडी, मुढेवाडी, घरनिकी, कानकात्रेवाडी, तनपुरेवाडी, आंबेवाडी, औटेवाडी, गुळेवाडी, कुरंदवाडी, येडे, रेणुसेवाडी, तुपेवाडी, पाडळी, कचरेवाडी, वाजेगाव, सोनसळ, फारणेवाडी, आंबेवाडी, अस्वलेवाडी, बेलेवाडी, उपवळे, अंत्री बुद्रुक, किनरेवाडी, मोहरे, सुंदलापूर, कदमवाडी, गुगवाड, व्हसपेठ, मल्हाळ, साळमाळगेवाडी, अमृतवाडी, पाच्छापूर, बालगाव, अग्रण धुळगाव, घाटनांद्रे, पिंपळवाडी, म्हैशाळ एम, करलहट्टी, सराटी, वाघोली, चुडेखिडी, गर्जेवाडी, मोटेवाडी तुर्क, जालीहाळ, अंकलगी, जालीहाळ खुर्द, निवर्गी, मायथळ, आंबाचीवाडी तसेच धोत्रेवाडी अशा ७९ गावांनी यावर्षी एक गाव योजनेत सहभाग नोंदवला आहे. एक गाव, एक गणपती संकल्पना राबवत असताना कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, तसेच याबाबत लोकांच्यात जागृतीही करावी, असे आवाहन घुगे यांनी केले.

हे वाचले का?  Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”