सांगली : तब्बल ३२२१ पुस्तकांचा वापर करत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा

५२० विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्य घेऊन साडेतीन हजार चौरस फुटामध्ये ही कोलाज कलाकृती साकारली.

कडेगाव तालुक्यातील अमरापुरच्या अभिजित कदम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका कलाशिक्षकांने तब्बल साडेतीन हजार चौरस फुटामध्ये पुस्तकांचा वापर करीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनोखी कोलाज प्रतिमा साकारली. या माध्यमातून बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करीत ग्रंथ हेच गुरु हा संदेश दिला आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी सलग दोन दिवस ५२० विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्य घेऊन साडेतीन हजार चौरस फुटामध्ये ही कोलाज कलाकृती साकारली. यासाठी ३२२१ पुस्तकांचा वापर करण्यात आला. याद्वारे ग्रंथ हेच गुरु हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.