लिंगमळा व स्मृतीवन परिसरातील झाडा झुडपांवर, पाना फुलांवर हि हिमकण आढळून आले. हिमकण आढळून येण्याची या वर्षातील हि पहिलीच वेळ आहे..
वाई : महाबळेश्वर पाचगणी या गिरीस्थळी थंडीचा कडाका वाढला आहे. पारा घसरल्याने महाबळेश्वर येथील वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे पहाटे पाहावयास मिळाले. वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पारा घसरल्याने या परिसरात उभ्या असणाऱ्या मोटारींच्या टपावर, काचेवर, वेण्णालेकच्या जेटीवर हिमकन जमा झाल्याचे दिसून आले. लिंगमळा व स्मृतीवन परिसरातील झाडा झुडपांवर, पाना फुलांवर हि हिमकण आढळून आले. हिमकण आढळून येण्याची या वर्षातील हि पहिलीच वेळ आहे.
नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य बुधवारी पहाटे पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेक सह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा खाली गेला आहे.महाबळेश्वर येथे चांगलीच थंडी आहे. वेण्णालेक परिसरामध्ये पुन्हा हिमकणाचा अनुभव पर्यटकांना मिळेल. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सौंदर्य पाहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांपासून थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे. सकाळी संध्याकाळी धुके आणि दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.धुक्यांमुळे ढग जमिनीवर उतरल्याचा भास होतो आहे. वेण्णालेक लिंगमळा परिसरामध्ये थंडी अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे.