सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी व बारावीच्या ‘मायनर सब्जेक्ट्स’च्या परीक्षा अनुक्रमे १७ व १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

नवी दिल्ली : दहावीच्या बोर्डाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा ३० नोव्हेंबरपासून, तर बारावीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होतील, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी जाहीर केले.

जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक प्रमुख विषयांसाठी (मेजर सब्जेक्ट्स) असून, इतर विषयांचे वेळापत्रक शाळांना स्वतंत्रपणे पाठवले जाईल, असे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले.https://253f749e8dea3a9183a1643de3f585cd.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

दहावी व बारावीच्या ‘मायनर सब्जेक्ट्स’च्या परीक्षा अनुक्रमे १७ व १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. शैक्षणिक सत्राचे द्विभाजन, दोन सत्रांत परीक्षा आणि अभ्यासक्रमाचे सुसूत्रीकरण  हा २०२१-२२ या वर्षात दहावी व बारावीच्या  परीक्षांसाठी विशेष मूल्यांकन योजनेचा भाग होता.