‘स्टेट बँक’मधील सायबर फसवणुकीत दुप्पट वाढ! माहितीच्या अधिकारातून वास्तव उघड

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखेमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात दुप्पट फसवणूक झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : केंद्र व राज्य सरकारकडून सायबर फसवणूक रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असल्याचा दावा होतो. परंतु, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखेमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात दुप्पट फसवणूक झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

हे वाचले का?  Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखेत २०१८-१९ या वर्षी ३ सायबर फसवणुकीचे प्रकरण घडले. त्यातून बँकेची ९५ लाखांची फसवणूक झाली. २०१९-२० या वर्षात बँकेची ४ प्रकरणात १७ लाखांनी फसवणूक झाली. २०२०-२१ मध्ये २१ प्रकरणांत बँकेची २.७४ कोटींनी फसवणूक झाली. २०२१-२२ मध्ये बँकेची ३२९ प्रकरणांत ४.४५ कोटी रुपयांनी फसवणूक झाली. तर २०२२-२३ मध्ये बँकेची ७२२ फसवणुकीत तब्बल ९.२३ कोटींनी फसवणूक झाली. त्यामुळे प्रत्येक वर्षात स्टेट बँकेत सायबर फसवणुकींचे प्रकरण वाढत असून त्यावर नियंत्रणात बँक प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे वास्तवही माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

हे वाचले का?  Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

आणखी वाचा-वाशीम : पैशांचा पाऊस…८ लाखाचे दुप्पट …अन पोलीस बनून लूट!

स्टेट बँकेतील फसवणुकीचे प्रकरण

वर्षप्रकरणे
२०१८-१९००३
२०१९-२०००४
२०२०-२१०२१
२०२१-२२३२९
२०२२-२३