स्वदेशी लढाऊ विमान ‘तेजस’ राजस्थानमध्ये कोसळले; वैमानिक सुरक्षित

तब्बल २३ वर्षांनी हवाई दलाचे स्वदेशी लढाऊ विमान तेजस अपघातग्रस्त झाले आहे.

भारतीय हवाई दलाचे हलके लढाऊ विमान ‘तेजस’ राजस्थानच्या जैसलमेर येथे कोसळले. युद्धसराव करत असताना ही दुर्घटना घडली. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार वैमानिक मात्र वेळेत विमानातून सुखरूप बाहेर पडला. तब्बल २३ वर्षांनी पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाचा अपघात झाला आहे.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

या दुर्घटनेनंतर हवाई दलाने सदर अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जैसलमेरच्या जवाहरनगरमध्ये सदर दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारत शक्ती कार्यक्रम ज्याठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणाहून १०० किमी अंतरावर सदर दुर्घटना घडली.

एएनआय वृत्तसंस्थेने अपघातानंतरचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. अपघातस्थळावरून मोठ्या प्रमाणात काळा धूर येत असल्याचे यात स्पष्ट दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून स्थानिकांना हटविण्याचा प्रयत्न केला.

हे वाचले का?  काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला आक्रमक, पाकिस्तानला इशारा देत म्हणाले…