होळकर पुलाच्या सुरक्षेसाठी पथदर्शी प्रकल्प

सेन्सर, कॅमेरे, भोंगा यांची व्यवस्था

नाशिक : नाशिकची ओळख असलेल्या अहिल्याबाई होळकर (व्हिक्टोरिया) पुलाच्या सुरक्षिततेसाठी उशिरा का होईना उपाययोजना करण्यात येत आहे. नाशिक स्मार्ट सिटीच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट ब्रीज सव्‍‌र्हायलन्स  सिस्टीम हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या माध्यमातून पुलावरील वाहतुकीनुसार निर्माण होणारी कंपनं (वेगवेगळया दिशांमधील निर्माण होणारे व्हायब्रेशन), स्तंभावर होणारा परिणाम, पुलावरील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी सव्‍‌र्हायलन्स कॅमेरे, लोकांना सजग करण्यासाठी भोंगे (पुलाच्या दोन्ही बाजूस एक किलोमीटपर्यंत ऐकू  जाईल, या क्षमतेचे), पुलाजवळील पुराची पातळी, त्या ठिकाणचे तापमान, आद्र्रता, हवेची गती या सर्वाची नोंद घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे सौर उर्जेचा वापर यासाठी के ला जाणार आहे. नाशिकमधील अरविंद जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी साकारलेल्या स्मार्ट ब्रीज सव्‍‌र्हायलन्स सिस्टीम या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मार्गदर्शनाखाली हा पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. होळकर पुलाखाली संवेदक (सेन्सर्स) बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनांचे मापन होऊन त्याबाबतची माहिती नियंत्रण कक्षात तात्काळ समजणार आहे. त्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये येथे लावण्यात आलेले संवेदक  वाजणार असून धोक्याची सूचना नागरिकांना तात्काळ समजणार असल्याने पुढील दुर्घटना टाळता येणे शक्य होणार आहे.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर जाधव या युवकाने या संकल्पनेवर काम सुरू केले होते. आता त्याच्या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात जानेवारीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. या माहितीमुळे पुलाखालील पूर पातळी कळण्यास, पुलाबाबतीत एखादी दुर्घटना घडण्याअगोदर पूर्वसूचना मिळण्यास किंवा दुर्भाग्यवश पुलाबाबतीत एखादी दुर्घटना घडल्यास लोकांना तात्काळ सजग करण्याकामी आपोआप भोंगे वाजणार असल्याने मदत होणार आहे. या प्रकल्पाचा आणि त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीचा पुढील दोन ते तीन महिने आढावा घेण्यात येणार आहे. गोदावरीला महापूर येतो, तेव्हा होळकर पुलाच्या ठिकाणी असलेल्या अडथळ्यांमुळे प्रवाह अधिक

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

वेगवान होत असल्याचे निरीक्षण आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे पुलाच्या सुरक्षिततेसह नागरिकांचीही सुरक्षितता जपली जाण्यास मदत होणार आहे.