ऑस्ट्रेलियातील उद्योजकांना मोदींचे भारतात गुंतवणुकीचे आवाहन

संवाद साधताना पंतप्रधानांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

सिडनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या उद्योजकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले आणि तंत्रज्ञान, कौशल्यवर्धन आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये भारतीय उद्योजकांशी सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या कार्यकारी अध्यक्षा जीना राइनहार्ट, फोर्टेस्क्यु फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष अँडर्य़ू फॉरेस्ट आणि ऑस्ट्रेलियन सुपरचे सीईओ पॉल श्रॉडर यांच्याशी स्वतंत्र बैठका घेतल्या. राइनहार्ट यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी भारतातील सुधारणा आणि नवीन उपक्रमांवर भर दिला आणि त्यांना तंत्रज्ञान, खनिकर्म आणि खनिज क्षेत्रात कौशल्यवर्धन आणि गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण दिले. श्रॉडर यांच्याबरोबरच्या बैठकीत पंतप्रधानांनी भारत हा जगात परकीय गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा देश असल्याचे सांगितले. फॉरेस्ट यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये भारतीय कंपन्यांशी भागीदारीचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी उद्योजकांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्यास तसेच भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यास उत्सुकता दर्शवली.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऑस्ट्रेलियामधील विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सामाजिक कार्य आणि कला व संगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेतली. त्यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते ब्रायन पॉल श्मिट, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक मार्क बल्ला, कलाकार डॅनियल मेट, रॉकस्टार गाय सेबॅस्टियन आणि नावाजलेले शेफ व हॉटेल उद्योजक सारा टॉड यांचा समावेश होता. त्याशिवाय सिडनीमधील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिटय़ूटचे मुख्य शास्त्रज्ञ प्रा. टोबी वॉल्श, आणि समाजशास्त्रज्ञ, संशोधक व लेखक साल्वाटोर बेबोन्स यांचीही त्यांनी भेट घेतली.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली.

स्वच्छता मोहिमेबाबत मोदींची प्रशंसा

स्वच्छता आणि शौचालय या विषयावरील ‘टॉयलेट वॉरियर’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिलेल्या मार्क बल्ला यांनी म्हटले आहे की, जगभरातील स्वच्छता चळवळीचा विचार करता पंतप्रधान मोदी हे नि:संशयपणे आघाडीवर आहेत. भारतातील स्वच्छ भारत अभियानातून मोदी हे बदलाचे अग्रणी ठरेल आहेत. त्यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली. मोदी यांनी संवाद साधलेल्या इतर मान्यवरांनीही त्यांची प्रशंसा केली.

हे वाचले का?  Khalida Zia : बांगलादेशात राजकीय घडामोडींना वेग; शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी तुरुंगातून सुटणार!