दहशतवादी वापरत असलेल्या ‘या’ १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर मोदी सरकारकडून बंदी, पाहा यादी

पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता.

देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अ‍ॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे सर्व मेसेंजर अ‍ॅप्स आहेत. या अ‍ॅप्सचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील दहशतवादी जम्मू काश्मीरमधील त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवण्यासाठी हे १४ अ‍ॅप्स वापरत होते. देशातील अनेक तपास यंत्रणांच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.

हे वाचले का?  ‘एचआयव्ही’चं ४२ हजार डॉलर्सचं औषध फक्त ४० डॉलर्समध्ये मिळू शकतं? नव्या संशोधनाचा निष्कर्ष

या १४ अ‍ॅप्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi आणि Threema चा समावेश आहे. आता सरकारने हे १४ अ‍ॅप्स भारतात बॅन केले आहेत.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हे अ‍ॅप्स डेव्हलप करणारे डेव्हलपर्स भारतातील नाहीत, तसेच हे अ‍ॅप्स भारतातून ऑपरेट केले जात नव्हते. त्यांचं कोणत्याही प्रकारचं कार्यालय भारतात नाही. तसेच कोणतीही माहिती घेण्यासाठी आपण हे अ‍ॅप्स बनवणाऱ्या कंपन्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करू शकत नाही.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

हे अ‍ॅप्स इतक्या बारकाईने डिझाईन केले आहेत की, या अ‍ॅप्सना किंवा त्यावरील संदेशांना ट्रॅक करता येत नाही. तसेच हे अ‍ॅप्स बनवणाऱ्या डेव्हलपर्सना शोधणं देखील अवघड आहे. देशातील विविध तपास यंत्रणांनी या अ‍ॅप्सवर लक्ष ठेवल्यानंतर लक्षात आलं की, या अ‍ॅप्सचा वापर दहशतवाद्यांकडून होत आहे. तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी त्यांच्या काश्मीरमधील सहकाऱ्यांना संदेश पाठवण्यासाठी या अ‍ॅप्सचा वापर करत असल्याचं आढळलं.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?