नागपूर : “ती” मान्सूनपूर्व पावसाचीच वर्दी; विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाड्यात ३१ मेपर्यंत पावसाचा तडाखा

मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा मात्र अजूनही कायम आहेत. त्यातच आता मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

नागपूर : मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा मात्र अजूनही कायम आहेत. त्यातच आता मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाड्यात ३१ मे पर्यंत पावसाचा तडाखा बसेल.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी भागात मात्र हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले नसल्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत पुन्हा एकदा हवामान बदलांची नोंद केली जाणार आहे. यावेळी बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसू शकतो

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

सध्या मान्सूनची वाटचाल सकारात्मक मार्गाने सुरू असून कोणताही अडथळा न आल्यास बंगालच्या उपसागरातून तो वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. एकीकडे हवामान खात्याकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता आहे.